IPL 2024 : आयपीएलमध्ये दंडाचा दिवस ; कोहली, डुप्लेसी, करनला शिक्षा

आयपीएलमध्ये रविवारचा दिवस हा डबल हेडर (दोन सामने) म्हणून ओळखला जातो; पण काल रविवारी झालेले सामने मात्र तीन खेळाडूंवर आर्थिक दंडाची कारवाई करणारे ठरले.
IPL 2024
IPL 2024 sakal

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये रविवारचा दिवस हा डबल हेडर (दोन सामने) म्हणून ओळखला जातो; पण काल रविवारी झालेले सामने मात्र तीन खेळाडूंवर आर्थिक दंडाची कारवाई करणारे ठरले. कालच्या रविवारी दुपारी बंगळूर आणि कोलकता यांच्यात तर सायंकाळी गुजरात आणि पंजाब यांच्यात सामना झाला.

यात गुजरातचा अपवाद वगळता इतर तीन संघांतील खेळाडूंना विविध कारणांमुळे दंड करण्यात आला. बंगळूरचा कर्णधार फाफ डुप्लेसी आणि विराट कोहली तर पंजाबचा कर्णधार सॅम करन यांच्यावर कारवाई करण्यात आली.

IPL 2024
T20 World Cup 2024 : वर्ल्डकपसाठी अशी असणार खेळपट्टी... दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल डुप्लेसी याला १२ लाखांचा दंड करण्यात आला. याच सामन्यात बिमर (कंबरेच्या वरील चेंडू) चेंडूवर बाद झाल्यामुळे विराट कोहलीने केलेल्या आकांडतांडवामुळे त्याच्यावर कारवाई होणार हे निश्चित होते.

मुळात त्याने मैदानावरील पंचांशी वाद घातला, त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना आजूबाजूला असलेल्या वस्तू लाथाडल्या होत्या. विराटच्या सामना मानधनातील ५० टक्के रक्कम कापण्यात आली. पंजाबचा कर्णधार सॅम करनवरही ५० टक्के सामना मानधन कापण्याची कारवाई करण्यात आली. पंचांनी दिलेल्या निर्णयावर त्यानेही वाद घातला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com