PBKS vs RR Live Score Update : पंजाबनं सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला; मात्र हेटमायरच्या दोन षटकारांनी विजयी झाले राजस्थान

PBKS vs RR
PBKS vs RResakal

Punjab Kinga Vs Rajasthan Royals : 

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 3 विकेट्स आणि 1 चेंडू राखून पराभव केला. याचबरोबर यंदाच्या हंगामात गुणतालिकेत डबल डिजीटमध्ये जाणारी पंजाब ही पहिली टीम ठरली.

पंजाब किंग्जने 148 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या राजस्थान रॉयल्सने हे आव्हान 7 फलंदाजांच्या मोबदल्यात 19.5 षटकात पार केलं. राजस्थानची चांगल्या सुरूवातीनंतर गाडी घसरली होती. कगिसो रबाडाने राजस्थानला यशस्वी अन् संजू सॅमसन असे दोन तगडे धक्के दिल्यानंतर त्यांची मधली फळी ढेपाळली. त्यामुळे सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला.

अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 10 धावांची गरज असताना हेटमायरने अर्शदीपच्या षटकात एक षटकार दोन षटकार राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 39 तर हेटमायरने 27 धावा केल्या. पंजाबकडून रबाडा आणि सॅम करनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

आयपीएलच्या 27 व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने होम टीम पंजाब किंग्जला 20 षटकात 8 बाद 148 धावात रोखले. राजस्थानकडून आवेश खान आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यांना चहल, बोल्ट आणि कुलदीप सेनने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

पंजाबची अवस्था 5 बाद 74 धावा अशी झाली असताना लियाम लिव्हिंगस्टोन (21) आणि जितेश शर्माने (29) संघाला शतक पार करून दिलं. त्यानंतर शेवटच्या तीन षटकात आशुतोष शर्माने 16 चेंडूत 31 धावा चोपून काढल्या. यामुळे पंजाबला 150 च्या जवळ जाता आलं.

हेटमायरने विजय आणला खेचून

शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना हेटमायरने पहिल्या दोन चेंडूवर एकही धाव घेतली नाही. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत सामना 3 चेंडूत 4 धावा असा आणला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर 2 धावा घेत सामना 2 चेंडूत 2 धावा असा आला. हेटमारने पाचव्या चेंडूवर षटकार मारत सामना राजस्थानला जिंकून दिला.

PBKS vs RR Live Score Update : पंजाबनं सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला;

अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांनी अनुक्रमे रियान पराग आणि ध्रुव जुरेलला बाद करत राजस्थानची अवस्था बिकट केली होती. त्यानंतर रोव्हमन पॉवेल आणि हेटमायर यांनी फटकेबाजी करत सामना आवाक्यात आणला होता. मात्र सॅम करनने 19 व्या षटकात पॉवेल आणि महाराजला बाद करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. राजस्थानला शेवटच्या षटकात 10 धावांची गरज होती.

यशस्वी अन् संजूची जोडी रबाडाने फोडली

कोटियन बाद झाल्यानंतर यशस्वी आणि संजूने डाव आक्रमकपणे पुढे नेला. या दोघांनी संघाला 82 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र रबाडाने या दोघांनाही बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. संजू बाद झाला त्यावेळी राजस्थानची अवस्था 3 बाद 89 धावा अशी झाली होती.

PBKS vs RR Live Score Update : यशस्वीचा इम्पॅक्ट मात्र रबाडानं राजस्थानचं वाढवलं टेन्शन

सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा आजच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला. त्याने तनुष कोटियनसोबत 56 धावांची सलामी दिली.

PBKS vs RR Live Score Update : आशुतोष शर्माचा जलवा; पंजाबचं शेवटच्या तीन षटकात जोरदार पुनरागमन

लियाम लिव्हिंगस्टोन बाद झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आशुतोष शर्मानं शेवटच्या तीन षटकात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याला 19 व्या षटकात जीवनदान देखील मिळालं. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. त्याने 16 चेंडूत 31 धावा करत पंजाबला 20 षटकात 8 बाद 148 धावांपर्यंत पोहचवलं.

PBKS vs RR Live Score Update : लिव्हिंगस्टोननं पोहचवलं पंजाबला शतक पार

जितेश शर्माच्या 29 आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या 21 धावांच्या जोरावर पंजाब किंग्जने शतकी मजल मारली. त्यानंतर आशुतोष शर्माने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवत शेवटच्या तीन षटकात 36 धावा वसूल करून घेतल्या.

जितेश शर्मा लढवतोय एकाकी किल्ला

पंजाबचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर जितेश शर्मा अन् लियाम लिव्हिंगस्टोन हे शेवटच्या 5 षटकात किल्ला लढवत आहेत.

PBKS vs RR Live Score Update : राजस्थानचा भेदक मारा, पंजाब किंग्जचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

राजस्थानच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पंजाबला त्यांच्यात होम ग्राऊंडवर सळो की पळो करून सोडलं. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर राजस्थानने पंजाबची 14 षटकात 5 बाद 75 धावा अशी अवस्था केली. केशव महाराजने दोन तर युझवेंद्र चहलने 1 विकेट्स घेतली. कुलदीप सेन आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली.

PBKS vs RR Live Score Update : पंजाबला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के; राजस्थानची पकड मजबूत

आवेश खानने अथर्व तायडे आणि युझवेंद्र चहलने प्रभसिमरनला बाद करत पंजाबची अवस्था 2 बाद 47 धावा अशी केली होती. त्यानंतर केशव महाराजने जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टो बाद झाल्यानंतर पंजाबची अवस्था 3 बाद 47 अशी झाली.

संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली 

संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने आजच्या सामन्यात अनेक बदल केले असून यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर आणि अश्विन हे संघात नाहीयेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com