
मंगळवार, ३ जून रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून त्यांची पहिला आयपीएल ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने पंजाबला जिंकण्यासाठी १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे फार कठीण नव्हते परंतु पंजाबचा संघ लक्ष्यापासून ७ धावांनी कमी पडला. शशांक सिंगने शेवटपर्यंत संघर्ष केला पण तो जिंकू शकला नाही.