

Rahul Dravid Sanju Samson rift speculations
राजस्थान रॉयल्सच्या इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील निराशाजनक कामगिरीला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात सुरू असलेले शित युद्ध जबाबदार आहे का? हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. कारण, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीनंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि चर्चा सुरू झाली. या व्हिडीओमध्ये राहुल द्रविड डग आऊटमध्ये RR च्या खेळाडूंना काहीतरी महत्त्वाचे सांगत असताना संजू बाजूला असूनही ते ऐकत नसल्याचे दिसले. सहकारी त्याला बोलवतही होता, परंतु त्याने त्याला हात हलवून नकार दिला.