
बंगळुरू : आयपीएल 2022 मेगा लिलावात (IPL 2022 Auction) पुण्याच्या राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi) सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) तब्बल 8.50 कोटी रूपये खर्च करून आपल्या संघात सामील करून घेतले. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीसाठी त्याची जुनी फ्रेंचायजी केकेआर आग्रही होती. (Rahul Tripathi got 8.50 crore in IPL 2022 Mega Auction brought by Sunrisers Hyderabad)
राहुल त्रिपाठीने केकेआरसाठी अनेक मॅच विनिंग खेळी साकारल्या होत्या. त्यामुळे ज्यावेळी त्रिपाठीचे नावाची बोली लावण्यासाठी घोषणा झाल्यानंतर केकेआरने त्याच्यासाठी बोली लावण्यास सुरूवात केली. मात्र चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) लिलावाच्या मैदानात उडी घेत केकेआरला चांगलीच टक्कर दिली. त्याचे हे बिडिंग वॉर 6 कोटीपर्यंत पोहचले असतानाच लिलावात सनरायजर्स हैदराबादने उडी घेतली. त्यांनी राहुल त्रिपाठीला 8.50 कोटीला खरेदी केले.
आयपीएलचा मेगा लिलावाची प्रक्रिया बंगळुरुमध्ये पार पडत आहे. आतापर्यंमत झालेल्या प्रक्रियेत ईशान किशनवर सर्वाधिक 15.75 रुपयांची मोठी बोली लागली. मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. त्याच्याशिवाय निकोलस पूरन, हर्षल पटेल यांना दुहेरी आकडा गाठत कोट्यवधीची किंमत मिळाली. श्रेयस अय्यरला मोठी रक्कम मिळाली. मार्की प्लेयरमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्याशिवाय सुरेश रेैना आणि स्मिथ हे दोघे अनसोल्ड राहिल्याचे पाहायला मिळाले. युवा खेळाडूंमध्ये देवदत्त पडिक्कललाही चांगला भाव मिळाला.
प्रियम गर्ग 20 लाख सनरायझर्स हैदराबाद
अभिनव सदारंगनी 2.6 कोटी गुजरात टायटन्स
डिवॉल्ड ब्रेविस 3 कोटी मुंबई इंडियन्स
अश्विन हेम्बार 20 लाख दिल्ली कॅपिटल्स
राहुल त्रिपाठी 8.5 कोटी सनरायझर्स हैदराबाद
अनकॅप्ड हिरोंवर पैशांची बरसात
अनकॅप्ड ऑल राउंडर
रियान पराग 3.8 कोटी राजस्थान रॉयल्सं
अभिषेक शर्मा 6.5 कोटी सनरायझर्स हैदराबाद
सरफराज खान 20 लाख दिल्ली कॅपिटल्स
शाहरुख खान 9 कोटी पंजाब किंग्ज
शिवम मावी 7.25 कोटी कोलकाता नाईट रायडर्स
राहुल तेवतिया 9 कोटी गुजराज टायटन्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.