IPL : राजस्थानने रोखला चेन्नईचा विजयरथ

पाचव्या विजयासह पहिल्या स्थानी; यशस्वी, ‍अश्‍विन, झाम्पाचे यश
 राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सsakal

जयपूर : राजस्थान रॉयल्सने गुरुवारी चेन्नई सुपरकिंग्सचा विजयरथ रोखला. यशस्वी जयस्वालची ७७ धावांची खेळी आणि ॲडम झाम्पा (३/२२) व रवीचंद्रन अश्‍विन (२/३५) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ३२ धावांनी विजयाला गवसणी घातली.

राजस्थानकडून मिळालेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईची सुरुवात संथ झाली. ॠतुराज गायकवाड व डेव्होन कॉनवे या जोडीने ४२ धावांची भागीदारी केली. पण कॉनवेला मोठे फटके खेळता आले नाही. कॉनवे बाद झाल्यावर ॠतुराज व अजिंक्य रहाणे ही जोडी चेन्नईसाठी मोलाची कामगिरी करील असे वाटत असतानाच दोघेही बाद झाले. चेन्नईने पाच धावांच्या अंतरात तीन विकेट गमावल्या. नंतर शिवम दुबे (५२ धावा), मोईन अली (२३ धावा) व रवींद्र जडेजा (नाबाद २३ धावा) यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

दरम्यान, याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल व जॉस बटलर या सलामी जोडीने आपला फलंदाजी फॉर्म कायम राखला. दोघांनी ८६ धावांची भागीदारी केली. नंतर यशस्वीने ४३ चेंडूंमध्ये ७७ धावांची मौल्यवान खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार व ४ षटकार मारले.

तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच तुषारने देशपांडेने त्याला तंबूत पाठवले. ध्रुव जुरेल व देवदत्त पडीक्कल या जोडीने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करीत राजस्थानला २०२ धावांपर्यंत नेले. जुरेल याने ३ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. तो धावचीत बाद झाला. देवदत्तने १३ चेंडूंमध्ये नाबाद २७ धावांची खेळी केली. या खेळीत ५ चौकारांचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक ः राजस्थान रॉयल्स २० षटकांत ५ बाद २०२ धावा (यशस्वी जयस्वाल ७७, ध्रुव जुरेल ३४, तुषार देशपांडे २/४२) विजयी वि. चेन्नई सुपरकिंग्स २० षटकांत ६ बाद १७० धावा (ॠतुराज गायकवाड ४७, शिवम दुबे ५२, रवींद्र जडेजा नाबाद २३, ॲडम झाम्पा ३/२२, रवीचंद्रन अश्‍विन २/३५).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com