
छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारीत साकारलेल्या छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडतोय आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. त्यातच इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्येही 'Chhavaa'ची जादू दिसतेय. आयपीएल २०२५ पूर्वी राजस्थान रॉयल्सच्या एका टीझर व्हिडिओने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा क्रिकेटपटू 'छावा' बनलेला आहे आणि आपल्या फॅन्ससाठी शपथ घेताना दिसतोय.