

Vaibhav Suryawanshi IPL Dream on Hold : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वात वैभव सूर्यवंशीची चर्चा रंगलेली आहे. १३ वर्षीय वैभवला राजस्थान रॉयल्स संघाने १ कोटी १० लाख रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. IPL 2025 ला सुरुवात होण्यापूर्वी वैभवच्या पदार्पणाचे संकेत प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले होते. पण, आताच हाती आलेल्या वृत्तानुसार वैभवला १३ व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळणार नाही.