RR vs RCB IPL 2024 : चौकार विजयाचा अन् पराभवाचाही... राजस्थानला घरच्या मैदानाचा फायदा होणार की आरसीबी मालिका खंडीत करणार?

Sanju Samson Virat Kohli
Rajasthan Royals Vs Royal Challengers Bengaluru esakal
Updated on

RR vs RCB IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 19 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. दोन रॉयल्सच्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं पारडं जड आहे. त्यांनी आतापर्यंत सलग 3 सामन्यात विजय मिळवला आहे तर चार सामन्यात आरसीबीला 3 पराभवांना सामोरे जावे लागले आहे.

आजच्या सामन्यात जरी आरसीबी हरली तर ते पराभवाचा चौकार मारतील तर आरआरचा विजयाचा चौकार पूर्ण होईल. आरसीबी या सामन्यात आपल्या पराभवाची साखळी तोडणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विराटवर अवलंबून असलेल्या आरसीबीने सांघिक कामगिरी केली तर त्यांना विजय मिळवता येईल.

Sanju Samson Virat Kohli
IPL 2024 Tickets Controversy : SRH vs CSK सामन्याचं तिकीट काढलं 4500 रूपयांच, सीट मात्र गायब... हा काय घोटाळा आहे?

गुणतालिकेत कोण कोणत्या स्थानावर?

आयपीएलच्या गुणतालिकेत तीन पैकी तीन सामने जिंकून 6 गुणांसह राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामन्यात त्यांचा पराभव झाल्याने ते 2 गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. जरी आरसीबीने आजचा सामना जिंकला तरी त्यांच्या गुणतालिकेतील स्थानात फारसा फरक पडणार नाहीये.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने आजचा सामना जिंकला तर ते विजयाचा चौकार मारतील अन् केकेआरला मागं टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावतील.

Sanju Samson Virat Kohli
Suryakumar Yadav: ठरलं तर! सूर्या दिल्लीविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी उतरणार मैदानात, टीममेट्सनेच दिली गुडन्यूज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com