

RR vs SRH
sakal
जयपूर : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज (ता. २५) आयपीएलमधील साखळी फेरीचा सामना जयपूर येथे रंगणार आहे. हैदराबादच्या संघाने मागील लढतीत राजस्थानवर ५७ धावांनी विजय मिळवला होता. आता या पराभवाची परतफेड करण्यासाठी यजमान राजस्थानच्या संघाने कंबर कसली असेल. हैदराबादचा संघ सलग चौथ्या विजयाचा प्रयत्न करताना दिसेल.