IPL 2024 RR vs PKBS : संजू सॅमसनच्या नेतृत्वाची परीक्षा ; मुल्लानपूर येथे राजस्थानचा संघ पंजाब किंग्सशी लढणार

सलग चार लढतींत विजय मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला यंदाच्या आयपीएल मोसमात गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत अखेरच्या चेंडूवर पराभवाला सामोरे जावे लागले.
IPL 2024 RR vs PKBS
IPL 2024 RR vs PKBSsakal

मुल्लानपूर : सलग चार लढतींत विजय मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला यंदाच्या आयपीएल मोसमात गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत अखेरच्या चेंडूवर पराभवाला सामोरे जावे लागले. या लढतीत अनुभवी ट्रेंट बोल्टऐवजी कुलदीप सेन व आवेश खान या गोलंदाजांवर भरवसा ठेवणाऱ्या संजू सॅमसनच्या नेतृत्वावर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली.

गुजरातने अखेरच्या दोन षटकांमध्ये ३५ धावांचा पाऊस पाडत विजय खेचून आणला. या पराभवामुळे राजस्थानची विजयी मालिका खंडित पडली. आता राजस्थानचा संघ उद्या पंजाब किंग्सशी दोन हात करणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चढ-उतारामधून जात असलेला पंजाबचा संघ कोणत्याही क्षणाला भरारी घेऊ शकतो.

याच कारणामुळे सॅमसनच्या नेतृत्वाची याप्रसंगी परीक्षा असणार आहे. संजू सॅमसन (२४६ धावा) व रियान पराग (२६१ धावा) यांच्याकडून सातत्याने धावा होत आहेत, पण यशस्वी जयस्वाल (६३ धावा), जॉस बटलर (१४३ धावा) व शिमरोन हेटमायर (४३ धावा) या स्टार खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा आवश्‍यक आहे. जयस्वाल व हेटमायर हे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. सॅमसन व पराग या दोघांवरच अवलंबून राहणे राजस्थानला आगामी लढतींमध्ये महागात पडू शकते.

राजस्थानच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केलेली आहे. युझवेंद्र चहल (१० विकेट), नांद्रे बर्गर (६ विकेट), ट्रेंट बोल्ट (६ विकेट) यांनी प्रतिस्पर्ध्यांना बांधून ठेवण्याचे काम केले आहे, पण आवेश खानच्या गोलंदाजीवर नऊच्या सरासरीने व कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर दहाच्या सरासरीने धावा वसूल करण्यात आल्या आहेत. रवीचंद्रन अश्‍विनचा सुमार फॉर्म हाही राजस्थानसाठी चिंतेचा विषय आहे.

IPL 2024 RR vs PKBS
LSG vs DC IPL 202 : दिल्लीनं दिला लखनौला घरच्या मैदानावर पहिला पराभवाचा धक्का

पंजाबच्या संघाला फलंदाजी कामगिरी उंचावण्याची गरज आहे. कर्णधार शिखर धवन (१५२ धावा), शशांक सिंग (१३७ धावा), आशुतोष शर्मा (दोन सामन्यांमधून ६४ धावा) यांनी महत्त्वाच्या क्षणी धावा फटकावल्या आहेत, पण जॉनी बेअरस्टो (८१ धावा), जितेश शर्मा (७७ धावा), सिकंदर रझा (४३ धावा) यांनी खेळ उंचावण्याची गरज आहे. सॅम करन, प्रभसिमरन सिंग यांनाही प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

रबाडा-अर्शदीप अव्वल दोन गोलंदाज

पंजाबसाठी कागिसो रबाडा व अर्शदीप सिंग यांनी अनुक्रमे ७ व ८ विकेट मिळवल्या आहेत, पण पंजाबला एकाहाती विजय मिळवून देण्यात त्यांना यश मिळालेले नाही. सॅम करन याने सहा फलंदाज बाद करीत गोलंदाजीत चांगली कामगिरी केलेली आहे. हर्षल पटेल व राहुल चहर या दोन्ही गोलंदाजांना लवकरच कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. पंजाबने आतापर्यंत पाच सामन्यांमधून दोन सामन्यांमध्ये विजय मिळवले असून, तीन सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com