Who replaced Smaran Ravichandran in SRH squad IPL 2025
इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ मधील सनरायझर्स हैदराबादचे आव्हान पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही आणि प्ले ऑफची अजूनही त्यांना संधी आहे. गतउपविजेत्या SRH ची यंदाच्या पर्वातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे, परंतु ते पुनरागमनाचासाठी जोर लावत आहेत. अशात त्यांनी २२ वर्षीय फिरकीपटूला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. विदर्भचा अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे हा हैदराबादच्या ताफ्यात दाखल झाला आहे. स्मरण रवीचंद्रन याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने २२ वर्षीय हर्षची त्याच्या जागी वर्णी लागली आहे. ३० लाख रुपयांच्या मुळ किमतीत तो या संघात दाखल झाला आहे.