जिंकली मुंबई इंडियन्स; पण हवा मात्र रणवीर सिंगचीच!

रोहितने शमीच्या चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने षटकार ठोकला तेव्हा रणवीर सिंगच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
Ranveer Singh Celebration
Ranveer Singh Celebration saka

Ranveer Singh Celebration IPL 2022: आयपीएलचा 51 वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आला होता. मुंबई इंडियन्सचे फलंदाज मैदानावर मोठे फटके मारत असताना रणवीर सिंग स्टँडवर बसून खेळाचा आनंद लुटताना दिसला. गुजरातविरुद्धच्या या सामन्यात मुंबईकडून कॅप्टन रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. ज्यावेळी रोहितने शमीच्या चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने षटकार ठोकला तेव्हा रणवीर सिंगच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. रणवीर सिंगचा सेलिब्रेशनचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Ranveer Singh Reaction When Mumbai Indians Won The Match)

रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध 28 चेंडूत 43 धावा केल्या. त्यात रोहितने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहित शर्माच्या फॉर्मवर या सामन्यापूर्वी प्रश्न उपस्थित केले जात होते, या हंगामात तो एकही मोठी खेळी खेळू शकलेला नाही. पण गुजरातविरुद्ध त्याने या खेळीतून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. रोहित शर्माशिवाय इशान किशनने 45 आणि टीम डेव्हिडने 44 धावांची नाबाद खेळी केली. मुंबईला चांगली सुरुवात करून देताना रोहित-इशानने पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली होती. अखेरीस टीम डेव्हिडने 21 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार मारते 44 धावांची खेळी खेळून संघाला 177 धावांपर्यंत नेले.

Ranveer Singh Celebration
कहीं खुशी कहीं गम! हार्दिकची नताशा हिरमुसली तर रोहितच्या रितिकाची कळी खुलली...

प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावाच करू शकला. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी नऊ धावांची गरज होती, मात्र गुजरातला केवळ तीन धावा करता आल्या. शेवटच्या षटकात मुंबईच्या डॅनियल सॅम्सने अप्रतिम गोलंदाजी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com