RR vs GT : राजस्थानचा 118 धावात सुपडा साफ; राशिद - नूरने दिले धक्क्यावर धक्के

Rajasthan Royals vs Gujarat Titans
Rajasthan Royals vs Gujarat Titans esakal

Rajasthan Royals vs Gujarat Titans : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात राजस्थानचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फारसा काही फळाला आला नाही. गुजरातने त्यांचा संपूर्ण संघ 118 धावात गारद करत सामन्यावर आपली मजबूत पकड मिळवली आहे. गुजरातकडून फिरकीपटू राशिद खान आणि नूर अहमद यांनी भेदक मारा करत राजस्थानचा निम्मा संघ गारद केला. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 30 धावा केल्या.

Rajasthan Royals vs Gujarat Titans
KL Rahul Injury : केएल राहुल आयपीएलच नाही तर WTC Final ला देखील मुकणार, सूर्यकुमारचे नशीब पुन्हा उघडणार?

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर जॉस बटलरला 8 धावांवर बाद केले.

राजस्थानचा सलामीवीर बटलर 8 धावा करून बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर यशस्वी जैसवाल देखील 14 धावा करून बाद झाला. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसनने 30 धावा करत संघाला अर्धशतक पार करून दिले. मात्र जोशुआ लिटीलने त्याची खेळी संपवली.

राजस्थानचे तगडे फलंदाज बाद झाल्यानंतर राशीद खानने अश्विनला 4 तर रियान परागला 2 धावांवर बाद करत राजस्थानची अवस्था 10 षटकात 5 बाद 72 अशी केली.

Rajasthan Royals vs Gujarat Titans
Kohli vs Gambhir IPL 2023 : कोहली-गंभीरला फक्त आर्थिक दंड नको थेट निलंबन करा; माजी खेळाडूची मागणी

यानंतर देवदत्त पडिक्कल आणि हेटमाय यांच्यावर राजस्थानचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. मात्र नूर अहमदने पडिक्कला 12 धावांवर बाद केले. त्यानंतर नूरने ध्रुव जुरेलची शिकार केली. हेटमायरही राशिद खानच्या गोलंदजीवर 8 धावा करून बाद झाला. राजस्थानची अवस्था 8 बाद 96 अशी झाली होती. अखेर ट्रेंट बोल्टने 15 आणि एडम झाम्पाने 7 धावा करत राजस्थानला शंभरी पार करून दिली. अखेर झाम्पा धावबाद झाला अन् राजस्थानचा डाव 118 धावात संपुष्टात आला.

(Sports Latest News)

हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com