विराटचा मेंदू थकलाय त्याला जरा ब्रेक द्या; रवी शास्त्रींची मागणी |Ravi Shastri says Virat Kohli need Break | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shastri says Virat Kohli need Break

विराटचा मेंदू थकलाय त्याला जरा ब्रेक द्या; रवी शास्त्रींची मागणी

रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या बॅड पॅचमधून (Bad Patch) जात आहे. आधी त्याच्या बॅटमधून 30, 40 धावा तरी निघायच्या मात्र आता त्याला या धावा करणेही मुश्किल झाले आहे. मंगळवारी झालेल्या लखनौ सुपर जायंटबरोबरच्या सामन्यात तर तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विराट कोहली आयपीएलमध्ये तब्बल 5 वर्षानंतर गोल्डन डकवर (Golden Duck) बाद झाला. विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीचा बॅड पॅच लगेचच ट्रेंडिंवर आला. दरम्यान, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीबाबत एक महत्वाचे विधान केले.

हेही वाचा: DC vs PBKS : दिल्लीचा अजून एक विदेशी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला विश्रांती देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, विराट कोहली दीर्घ काळापासून क्रिकेट खेळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या क्रिकेट वर्तुळात बायो बबल पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे खेळाडूंचा बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे विराट कोहली मानसिक दृष्या एकदम थकून गेला आहे. जर विराट कोहलीला उरलेल्या कारकिर्दित उत्तम क्रिकेट खेळायचे असेल तर त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे.

हेही वाचा: IPL 2020 मध्ये कोहलीबरोबर झालेलं भांडण: सूर्यकुमार यादवने दिलं उत्तर...

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहली सध्या बॅड पॅचमधून जात आहे. त्याच्या कारकिर्दिची अजून 6 ते 7 वर्षे शिल्लक आहेत. अशा वेळी टीम इंडियाने विराट कोहलीला अजून अडचणीत ढकलायचे की त्याला विश्रांती द्याची हे ठरवले पाहिजे. बायो बबलमधील क्रिकेट मानसिकदृष्या थकवणारे (Mentally Drained) असल्याने चिंता वाढली आहे.

शास्त्री पुढे म्हणाले की, मी ज्यावेळी टीम इंडियाचा प्रशिक्षक होतो त्यावेळी मी एका गोष्टीवर खूप भर दिला. खेळाडूकडे सहानभूतीपूर्वक पाहिले पाहिजे. जर तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करायला लागला तर खेळाडू स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःलाच हरवून बसण्याचा धोका असतो. यावेळी तुम्हाला अत्यंत सतर्क रहावे लागेल.

Web Title: Ravi Shastri Says Virat Kohli Need Break For Save His Carrier

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..