Shivam Dube : विश्वकरंडक स्पर्धा दुबे गाजवेल ;रवी शास्त्री

टोलेजंग षटकार मारण्याची ताकद असलेला शिवम दुबे आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा गाजवेल, भारतीय संघासाठी तो सर्वात महत्त्वाचा हुकमी खेळाडू ठरणार आहे, असा विश्वास माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.
Shivam Dube
Shivam Dubesakal

नवी दिल्ली : टोलेजंग षटकार मारण्याची ताकद असलेला शिवम दुबे आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा गाजवेल, भारतीय संघासाठी तो सर्वात महत्त्वाचा हुकमी खेळाडू ठरणार आहे, असा विश्वास माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी प्रथमच स्थान मिळालेला दुबे हा मध्यमगती गोलंदाजही आहे; पण मधल्या फळीतील त्याची फलंदाजी भल्याभल्यांना चकित करणारी ठरत आहे. चेन्नई संघातून खेळताना त्याने ११ सामन्यातून ३५० धावा केल्या आहेत, त्यापेक्षा त्याचा १७० पेक्षा अधिक असलेला स्ट्राईक रेट अफलातून आहे. युवराज सिंगप्रमाणे त्याची सिक्सर किंग अशी ओळख निर्माण झाली आहे. यंदाच्या स्पर्धेत केवळ अभिषेक शर्माने दुबेपेक्षा अधिक षटकार (२६) मारले आहेत.

दुबेवर लक्ष ठेवा आणि तो खतरनाक फलंदाज आहे. तो प्रतिस्पर्ध्यांना गारद करू शकतो, तो मॅचविनरही आहे, तो अगदी सहजतेने षटकार मारतो आणि फिरकी गोलंदाजांना संपवूनच टाकतो, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

पहिल्या चारही फलंदाजांकडून शतके

ट्वेन्टी-२० प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सोमवारी शतक केले, त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार या पहिल्या चारही फलंदाजांनी या आयपीएलमध्ये शतके केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com