Ravindra Jadeja Out Obstructing field Against Rajasthan Royals
Ravindra Jadeja Out Obstructing field Against Rajasthan Royalsesakal

Ravindra Jadeja CSK vs RR : रविंद्र जडेजाचं 'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड', मुद्दाम केलं की ठरला अनलकी? पाहा VIDEO

Ravindra Jadeja Out Obstructing field Against Rajasthan Royals : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामन्यादरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये एक मोठा ड्रामा झाला. CSK चा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील फक्त तिसरा क्रिकेटर बनला जो फिल्डिंग करताना अडथळा आणल्याबद्दल बाद झाला.

यापूर्वी आयपीएलमध्ये ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड नियमाअंतर्गत युसूफ पठाण आणि अमित मिश्रा बाद झाले होते. आता या यादीत रविंद्र जडेजाचे देखील नाव जोडले गेले आहे. सामन्याच्या महत्त्वाच्या 16व्या षटकात, जडेजाने आरआरच्या आवेश खानकडून थर्ड मॅनकडे चेंडू टाकला आणि एक धाव घेतली.

Ravindra Jadeja Out Obstructing field Against Rajasthan Royals
MS Dhoni CSK vs RR : चेपॉकवर धोनीची सामन्यानंतर फटकेबाजी; चाहत्यांनी स्टेडियम घेतलं डोक्यावर

तथापि, त्याचा सहकारी आणि सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्याकडून या सिंगलसाठी नकार मिळाला. मात्र तराही जडेजा धावण्यासाठी पुढे सरसावला. जडेजा खेळपट्टीच्या मध्यभागी धावत असताना, आरआर कर्णधार आणि यष्टिरक्षक संजू सॅमसनने जडेजाला धावबाद करण्याच्या प्रयत्न केला.

त्याने चेंडू नॉन-स्ट्रायकरच्या एंडकडे फेकला, परंतु तो जडेजाच्या पाठीवर आदळला. चिडलेल्या सॅमसनने त्वरीत मैदानात अडथळा आणण्याचे आवाहन केले आणि पंचांनी देखील संजूची अपील उचलून धरत जडेजाला बाद केलं.

यावेळी जडेजाला थ्रो आपल्या बाजूने येणार आहे हे माहिती होतं. त्यानं मागं वळून सॅमसन थ्रो करतोय का हे पाहत होता. त्यामुळे पंचांनी जडेजाला बाद ठरवलं.

Ravindra Jadeja Out Obstructing field Against Rajasthan Royals
Sunil Gavaskar IPL 2024 : आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा! गावसकरांनी BCCI कडे केली मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com