Glenn Maxwell : "कदाचित आता वेळ आली..." RCB च्या खराब कामगिरीनंतर मॅक्सवेलने उचलले मोठं पाऊल!

Glenn Maxwell Break from IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. लागोपाठच्या पराभवांमुळे अडचणीत आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे.
Glenn Maxwell Break from IPL 2024 News Marathi
Glenn Maxwell Break from IPL 2024 News Marathisakal

Glenn Maxwell In IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. लागोपाठच्या पराभवांमुळे अडचणीत आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2024 सीझन-17 मधून ब्रेक घेतला आहे. यामागचे कारणही त्यांनी दिले आहे.

Glenn Maxwell Break from IPL 2024 News Marathi
Video : RCB वर अन्याय... फाफ डू प्लेसिसचा धक्कादायक आरोप; मुंबईविरुद्ध टॉसवेळी काय झालं?

मॅक्सवेल या मोसमात आतापर्यंत अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसत होता. एका पण सामन्यात त्याच्या बॅटमधून चांगली खेळी आली नाही. त्यानंतर मॅक्सवेलवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या हंगामात, मॅक्सवेलने 6 सामने खेळले, ज्यात त्याने 5.33 च्या सरासरीने आणि 94.11 च्या स्ट्राइक रेटने केवळ 32 धावा केल्या. या काळात मॅक्सवेलही तीनवेळा शून्यावर बाद झाला.

Glenn Maxwell Break from IPL 2024 News Marathi
Dinesh Karthik : 5 चौकार, 7 षटकार अन् DK चा राडा....! अवघ्या 2 तासात दिनेश कार्तिकने मोडला IPL 2024 मधला 'हा' रेकॉर्ड

आयपीएल 2024 मधून ब्रेक घेण्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की, कदाचित आता वेळ आली, माझ्या जागी संघात दुसऱ्याला संधी देण्याची. हा निर्णय माझ्यासाठी सोपा होता. मला स्वतःला थोडी मानसिक आणि शारीरिक विश्रांती देण्याची गरज आहे. याबाबत मी प्रशिक्षक आणि कर्णधाराशी बोललो होतो. जर संघाला माझी आणखी गरज भासली तर मी निश्चितच ठोस मानसिकतेने पुनरागमन करेन. पॉवरप्लेनंतर संघासाठी माझ्याकडून अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

आरसीबीसाठी हा हंगामा आतापर्यंत खूपच खराब राहिला आहे, संघाने आतापर्यंत 7 पैकी 6 सामने गमावले आहेत. आरसीबीला आतापर्यंत फक्त एकच विजय मिळाला आहे. गुणतालिकेत संघ तळाच्या 10व्या स्थानावर आहे. येथून आणखी एक पराभव झाला तर आरसीबी प्लेऑफमधून बाहेर जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com