IPL Final 2025 Royal Challengers Bengaluru CLINCH THE TITLE : १७ वर्ष, ६२५६ दिवस आणि ९०,०८,६४० मिनिटांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद नावावर केले. आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये पंजाब किंग्सवर ६ धावांनी विजय मिळवून RCB ने ट्रॉफी उंचवाली. शेवटच्या षटकात दोन निर्धाव चेंडू पडल्यानंतर विजय निश्चित होताच विराट कोहली ( Virat Kohli) याचे डोळे पाणावले, तो स्वतःला सावरत होता. १८ वर्ष तो एकाच फ्रँचायझीकडून खेळला आणि तीनवेळा जेतेपदाच्या जवळ जाऊन माघारी परतला होता. पण, आज त्याचा दिवस होता आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने दुष्काळ संपवला.