IPL 2025 RCB vs LSG match result and statistics : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये कालच्या शेवटच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर रोमहर्षक विजय मिळवला. LSG चे २२८ धावांचे लक्ष्य RCB ने १८.४ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले आणि क्वालिफायर १ मधील आपली जागा पक्की केली. या विजयानंतर RCB ने अनेक विक्रमांना गवसणी घातली, परंतु एक असा विक्रम त्यांनी काल नोंदवला, जो आयपीएल इतिहासात एकाही संघाला करता आलेला नाही.