बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांकडून कारवाई सुरू असून, आता विराट कोहलीविरुद्धही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.