RCB social media record after IPL 2025 win : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पंजाब किंग्सचा पराभव करून पहिले आयपीएल जेतेपद नावावर केले. बंगळुरूच्या ९ बाद १९० धावांचा पाठलाग करताना पंजाबला ७ बाद १८४ धावाच करता आल्या. कृणाल पांड्या ( २-१७) या सामन्यातील मॅच विनर खेळाडू ठरला. १८ वर्ष वाट पाहिल्यानंतर RCB ला आयपीएल जेतेपद पटकावता आले. १७ वर्ष, ६२५६ दिवस आणि ९०,०८,६४० मिनिटांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद नावावर केले. काल रात्रभर RCB च्या खेळाडूंनी या विजयाचा जल्लोष केला आणि त्याचबरोबर त्यांनी अर्जेंटिना फुटबॉल संघाच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली.