esakal | Video : विराट कॅप्टन्सीचा शेवट पराभवासह पंचासोबतच्या वादानं
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Video : विराट कॅप्टन्सीचा शेवट पराभवासह पंचासोबतच्या वादानं

sakal_logo
By
सुशांत जाधव

Virat Kohli Fight With Umpire : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्सच्या पदरी निराशा आली. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना 4 विकेट्सने पराभूत करुन स्पर्धेतून बाद केले. विराट कोहलीच्या कॅप्टन्सीचा हा शेवटचा सामना ठरला. यंदाच्या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व सोडणार असल्याचे कोहलीने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली स्पर्धेत जेतेपद घेऊन मिरवण्याचं स्वप्न अखेर स्वप्नचं राहिले.

क्रिकेटच्या मैदानात कोहली आपल्या आक्रमक फलंदाजीप्रमाणे देहबोलीनंही लक्षवेधून घेत असतो. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातही तोच प्रकार पाहायला मिळाला. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात कोहलीने मैदानातील पंचांशी शाब्दिक वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला कोहली रागात दिसला आणि पुन्हा तो शांतही झाला. नेतृत्व करत असलेल्या अखेरच्या सामन्यातही एक वादाची किनार त्याला चिकटली.

हेही वाचा: KKR च्या सुनील नारायणचा 'मै हूँ.. ना शो' RCB आउट!

कोलकाता नाइट रायडर्सच्या डावातील 7 व्या षटकात युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. त्याने आपल्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठी विरुद्ध पायचितचे अपील केले. मैदानातील पंच विरेंद्र शर्मा यांनी राहुल त्रिपाठीला नाबाद ठरवले. कोहलीने विकेट किपर भरतला चेंडू पॅडला आधी लागलाय ना!.. असे विचारत रिव्ह्यू घेतला. त्याचा हा रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि कोलकाताला राहुल त्रिपाठीच्या रुपात एक धक्का बसला.

हेही वाचा: छोट्याखानी खेळीतही कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम

रिव्ह्यूनंतर पंचांनी आपला निर्णय बदलला असला तरी त्यादरम्यान मैदानात घडलेल्या प्रकाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या निर्णयानंतर विराट कोहली पंचाकडे जाऊन त्यांच्याशी हुज्जत घालताना दिसले. विराट आपली अख्खी ब्रिगेड घेऊनच पंचाच्या दिशेनं गेल्याचे पाहायला मिळाले. शेवटी पंचाशी स्माईल करत सर्वकाही ठिकठाक असल्याचे संकेतही मिळाले.

विराट आणि मैदानातील पंच यांच्यात जो काही प्रकार घडत होता त्यावर समालोचन करणाऱ्या माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी आपले मतही व्यक्त केले. कोहलीने अशा प्रकारे पंचाकडे स्पष्टीकरण मागणे योग्य नाही. पंच आपला निर्णय समजावून सांगण्यास बांधील नसतो, असेही गावसकर यावेळी म्हणाले.

loading image
go to top