
Rajat Patidar : आयपीएल 2023च्या सुरुवातीलाच आरसीबीचा खेळाडू रजत पाटीदारच्या दुखापतीची बातमी समोर आली होती. मध्य प्रदेशातील या स्टार क्रिकेटरला दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून बाहेर व्हावे लागले. वैद्यकीय तपासणीत रजत पाटीदार यांच्या डाव्या टाचेवर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे आढळून आले. आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने रजत पाटीदार यांच्या शस्त्रक्रियेचा सर्व खर्च उचलणार असल्याचे सांगितले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआय रजत पाटीदारला शस्त्रक्रियेसाठी इंग्लंडला पाठवणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र तो केंद्रीय करार यादीत नाही. पण तो प्रतिभावान खेळाडू आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला पदार्पण करता आले नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने एका निवेदनात म्हटले आहे की, “दुर्दैवाने रजत पाटीदार टाचेच्या दुखापतीमुळे IPL 2023 मधून बाहेर पडला आहे. रजत लवकर बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. रजत पाटीदार हा तोच खेळाडू आहे, ज्याने 2022 मध्ये आरसीबीसाठी प्लेऑफमध्ये शानदार शतक झळकावले होते.
रजत काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बेंगळुरू येथे पुनर्वसन प्रक्रियेतून जात होता. तो एनसीएमधील वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली होता. सध्या तो त्याच्या घरी आहे आणि इंग्लंडला जाण्यासाठी त्याच्या व्हिसाची वाट पाहत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.