RCB Victory Parade in Bengaluru
RCB Victory Parade in Bengaluruesakal

RCB Victory Parade in Bengaluru: होऊ दे खर्च...! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी मिरवणूक; ओपन डेक बसमधून चाहत्यांचे आभार मानणार, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

RCB Victory Parade full route and time details : १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर IPL ट्रॉफी पटकावणाऱ्या RCB संघाने बंगळुरूमध्ये चाहत्यांसोबत आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीसह संपूर्ण संघ विजयी मिरवणुकीसाठी ओपन डेक बसमध्ये बसून शहरात रॅली करणार आहे.
Published on

Virat Kohli and RCB celebrate with fans in Bengaluru : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या जेतेपदाला गवसणी घातली आणि देशभरात RCB चाहत्यांनी जल्लोष केला. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे RCB च्या चाहत्यांनीची खचाखच भरले होते आणि मध्यरात्री जेतेपदाची ट्रॉफी उंचावताना संघाला पाहण्यासाठी ते शेवटपर्यंत स्टेडियमवरच थांबले होते. अहमदाबाद जणू बंगळुरू फ्रँचायझीचे होम ग्राऊंड आहे असेच भासत होते. तिथे कर्नाटकमध्येही जल्लोष झाला.. चाहते रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत होते. का नाही करणार, १८ वर्षानंतर त्यांच्या संघाने आयपीएल ट्रॉफी जी जिंकली होती. आयपीएल फ्रँचायझींमध्ये सर्वात लॉयल फॅन RCB चा आहे. याच फॅन्ससाठी जेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी RCB ने बंगळुरूत मिरवणुक काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com