RCB Victory Parade Stampede: चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं? ११ जणांचा मृत्यू पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितला सर्व प्रसंग; पाहा Video

Bengaluru Stampede death toll is now at 11. Over 50+ injured : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे जेतेपद जिंकले. १७ वर्षानंतर RCB च्या जेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर जंगी सेलिब्रेशनची तयारी झाली होती. मोठ्या संख्येने चाहते आपल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर तौबा गर्दी झाली होती आणि चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
RCB Victory Parade Turns Tragic
RCB Victory Parade Turns Tragic
Updated on

RCB’s victory parade cancelled due to crowd surge : अहमदाबाद येथे काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये पंजाब किंग्सचा पराभव करून इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे जेतेपद नावावर केले. १८ वर्षांत प्रथमच RCB ला जेतेपद जिंकता आल्याने खेळाडूंसह चाहते भावनिक झाले होते. इतक्या वर्षांची फ्रँचायझीसोबत एकनिष्ठ राहण्याचं फळ विराट कोहली व चाहत्यांना मिळालं होतं. त्यामुळेच बंगळुरूत विजयी मिरवणूक काढण्याचे नियोजन आखले गेले होते. पण, चाहत्यांची संख्या प्रंचड होती आणि त्यांना आवरणे पोलिसांना अवघड झाले. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि त्यात चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे व ५० हून अधिक लोकं जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com