
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला शनिवारी (३ मे) रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बंगळुरूने घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अवघ्या २ धावांनी विजय मिळवला. या पराभवासाठी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने स्वत:ला जबाबदार धरले आहे.
या सामन्यात बंगळुरूने २० षटकात ५ बाद २१३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून जेकॉब बेथल (५५), विराट कोहली (६२) आणि रोमारियो शेफर्ड (५३*) यांनी अर्धशतके केली. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने ३ विकेट्स घेतल्या.