IPL 2024 : बंगळुरूचे प्लेऑफचे स्वप्न भंगणार... चाहत्यांचे टेन्शन वाढले; RCB vs CSK सामना होणार रद्द? हे आहे कारण

RCB Vs CSK IPL 2024 Weather Report : आयपीएल 2024 मध्ये 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो जवळजवळ प्लेऑफसाठी पात्र होईल.
RCB Vs CSK IPL 2024 Weather Report M Chinnaswamy Stadium News
RCB Vs CSK IPL 2024 Weather Report M Chinnaswamy Stadium Newssakal

RCB Vs CSK IPL 2024 Weather Report: आयपीएल 2024 मध्ये 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो जवळजवळ प्लेऑफसाठी पात्र होईल.

पण या सामन्यापूर्वी चाहत्यांचे टेन्शन वाढले. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. 18 मे रोजी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

RCB Vs CSK IPL 2024 Weather Report M Chinnaswamy Stadium News
IPL 2024 प्लेऑफपूर्वी गंभीरच्या कोलकाताला मोठा धक्का, स्टार सलामीवीरने अचानक सोडली संघाची साथ

बेंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून 13 सामन्यांतून 6 विजयांसह 12 गुण आहेत. त्याच वेळी, त्याचा निव्वळ रन रेट +0.387 आहे, जो अनेक संघांपेक्षा चांगला आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आरसीबीला 14 गुणांपर्यंत पोहोचावे लागेल आणि त्यासाठी त्यांना चेन्नई सुपर किंग्जला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल.

RCB Vs CSK IPL 2024 Weather Report M Chinnaswamy Stadium News
IPL 2024 KKR : रिंकूच्या फॅनचा धिंगाणा! पोलिसांनी पॅन्टमधून शोधून काढला मॅच मधला चेंडू... १६ सेकंदांचा मजेशीर व्हिडिओ Viral

येत्या शनिवारी होणाऱ्या सामन्याबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चांगली बातमी नाही. खरं तर, हवामान खात्यानुसार 18 मे रोजी पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्द झाल्यास आरसीबीला फक्त 1 गुण मिळतील आणि त्याचे एकूण केवळ 13 गुण असतील, तर सध्या चार संघांचे 14 किंवा त्याहून अधिक गुण झाले आहेत. अशा परिस्थितीत आरसीबीचे 13 गुण होतील आणि संघ प्लेऑफमधून बाहेर पडेल.

RCB Vs CSK IPL 2024 Weather Report M Chinnaswamy Stadium News
T20 World Cup 2024 : कर्णधार रोहित अन् आगरकरला हार्दिक पांड्या संघात नको होता; मग तरी कशी झाली निवड?

दुसरीकडे सामना रद्द झाल्यास, चेन्नई सुपर किंग्जचे 15 गुण होतील आणि त्यानंतर प्लेऑफसाठी लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com