IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

RCB vs DC Live Scorecard Updates IPL 2024 : आयपीएल 2024 चा 62 वा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
RCB vs DC
RCB vs DC Live Score IPL 2024 Updates News MarathiESAKAL

IPL 2024 RCB vs DC Live Score : दिल्लीची अवस्था खराब; आरसीबीने 4 षटकात केले 4 फलंदाज बाद

आरसीबीचे 188 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची अवस्था बिकट झाली. 3.3 षटकात दिल्लीनं 4 फलंदाज गमावले. त्यांनी 30 धावांपर्यंच मजल मारली होती.

IPL 2024 RCB vs DC Live Score : दिल्लीने आरसीबीला 200 धावांच्या आत रोखले

दिल्ली कॅपिटल्सने स्लॉग ओव्हरमध्ये चांगला मारा करत आरसीबीला 200 धावांच्या आत रोखले. आरसीबीने 20 षटकात 9 बाद 187 धावा केल्या. दिल्लीकडून खलील आणि सलामने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

IPL 2024 RCB vs DC Live Score : दिल्लीनं जोडी फोडली, आरसीबी तरी 150 पार

रजत पाटीदार आणि विल जॅक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी रचली. यानंतर अक्षर आणि रसिख सलमानने ही जोडी फोडली. आरसीबीने त्यानंतर 17 षटकात 169 धावांपर्यंत मजल मारली.

दोन सेटबॅकनंतर आरसीबीची दमदार फलंदाजी 

इशांत शर्माने विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांची विकेट घेतली. मात्र त्यानंतर रजत पाटीदार आणि विल जॅक्स यांनी दमदार फलंदाजी करत 11 षटकात 2 बाद 118 धावा चोपल्या.

IPL 2024 RCB vs DC Live Score : चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले... आजच IPL मधून बाहेर RCB जाणार? दिल्लीशी सामना

पंतच्या अनुपस्थितीत आजच्या आयपीएल सामन्यात दिल्ली संघाला फॉर्मात आलेल्या बंगळूर संघाविरुद्ध खेळावे लागणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा -

IPL 2024 : दिल्लीच्या कर्णधारवर बंदी, बंगळूरला संधी... RCB की DC आज कोणाचा खेळ खल्लास होणार?

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Live Score IPL 2024 : रॉयल चॅलेंजर बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव करत आपल्या प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 187 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला 140 धावात ऑल आऊट केलं. आरसीबीचा हा सलग पाचवा विजय आहे.

आरसीबीकडून फलंदाजीत रजत पाटीदारने 52 तर विल जॅक्सने 41 धावा केल्या. विराट कोहलीने देखील 27 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून खलील आणि रसिखने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स फलंदाजी करत असताना आरसीबीच्या गोलंदाजांनी त्यांची अवस्था 4 बाद 30 धावा अशी केली होती. त्यानंतर कर्णधार अक्षर पटेलने 57 धावांची झुंजार खेळी करत दिल्लीचे आव्हान जिवंत ठेवलं होतं. मात्र आरसीबीने दिल्लीचा डाव 140 धावात गुंडाळत सामना खिशात टाकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com