RCB Playoffs Scenario: पावसामुळे आरसीबीचे प्लेऑफचे स्वप्न भंगणार! जाणून घ्या सामन्यादरम्यान हवामान कसे?

.... अशा स्थितीत बंगळुरू संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवित
ipl 2023 points table rcb vs mi playoff scenario kkr vs pbks
ipl 2023 points table rcb vs mi playoff scenario kkr vs pbks

IPL 2023 RCB Playoffs Scenario : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळल्या जाणार आहे. यानंतर 23 मे पासून प्लेऑफचे सामने खेळले जाणार आहे. आतापर्यंत 3 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. चौथा संघ कोणता असेल, हे या सामन्यानंतरच ठरेल. आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्यातही पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत बंगळुरू संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवित होऊ शकतात.

ipl 2023 points table rcb vs mi playoff scenario kkr vs pbks
MS Dhoni Injury Update : धोनी IPLच्या प्लेऑफमध्ये नाही खेळणार? CSK कोचने दिली मोठी अपडेट

आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्यादरम्यान हवामान खात्यानुसार, AQ वेदरनुसार, 60 ते 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी 1 नंतर बंगळुरूच्या हवामानात बदल दिसून येतील. सामन्यादरम्यान सुमारे 70 टक्के पाऊस अपेक्षित आहे. तापमानाबद्दल बोलायचे झाले तर ते किमान 23 तर कमाल 26 अंश सेल्सिअस असू शकते.

पावसामुळे हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांचे 1-1 गुण होतील. अशा स्थितीत बंगळुरूला 15 गुण मिळतील. पण मुंबई इंडियन्सने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादला हरवले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. मात्र हैदराबाद संघाने मुंबईला पराभूत केल्यास आरसीबी सामना रद्द होऊनही १५ गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल.

आरसीबी सध्या 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. बंगळुरूचा नेट रन रेट मुंबई इंडियन्सपेक्षा खूपच चांगला आहे. आतापर्यंत गुजरात, चेन्नई आणि लखनौचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com