

RCB vs Gujarat Titans
sakal
बंगळूर : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ आज (ता. २४) आपल्या घरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलमधील साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. या लढतीत विजय मिळवून आपल्या चाहत्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न त्यांचा संघ करताना दिसेल. बंगळूर संघासमोर गुजरात टायटन्स संघाचे आव्हान असणार आहे. दोन्ही संघ या लढतीत फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.