RCB vs KKR Playing 11IPL 2024 : आरसीबीच्या होम ग्राऊंड खेळताना केकेआर बदलणार का आपली रणनिती अन् प्लेईंग 11

RCB vs KKR Playing 11IPL 2024
RCB vs KKR Playing 11IPL 2024 esakal

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 10 व्या सामन्यात आरसीबी आणि केकेआर एकमेकांना भिडणार आहे. हा सामना 29 मार्चला चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. हे आरसीबीचे होम ग्राऊंड आहे. आरसीबी आणि केकेआर दोन्ही संघ तगडे आहेत. त्यामुळे सामना जबरदस्त होण्याची शक्यता आहे. याचबरोबर विराट अन् गौतम गंभीर यांच्यातील टसल देखील हा सामना हाय व्होल्टेज करतो.

केकेआरने सनराईजर्स हैदराबादचा पराभव करत आपलं विजयाचं खातं उघडलं. आरसीबीने चेन्नईकडून पराभव स्विकारल्यानंतर होम ग्राऊंडवर पंजाब किंग्जचा पराभव करत जोरदार पुनरागमन केलं. केकेआर आरसीबी यांच्यातील रायव्हलरी खूप खास आहे. त्यामुळे आरसीबी आणि केकेआर कोणत्या प्लेईंग 11 सोबत मैदानात उतरतील हे पाहूया...

RCB vs KKR Playing 11IPL 2024
IPL 2024 Mistry Girl : रोहित, हार्दिकसोबत फोटो व्हायरल... कोण आहे मिस्ट्री गर्ल सेजल जैस्वाल?

कशी असेल RCB ची प्लेईंग 11?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव केला. आरसीबीने हा सामना चिन्नास्वामीवरच खेळला होता. त्यामुळे आता केकेआरविरूद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जवालीच प्लेईंग 11 कायम ठेवण्याचा फाफचा विचार असेल. मात्र इम्पॅक्ट प्लेअर म्हणून विल जॅक्स खेळण्याची शक्यता आहे. आरसीबी आपल्या प्लेईंग 11 मध्ये जास्त बदल करण्याची शक्यता नाही.

RCB ची प्लेईंग 11 :

विराट कोहली, फाफ ड्युप्लेसिस, कॅमरून ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, अल्जारी जोसेफ, मयांक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

RCB vs KKR Playing 11IPL 2024
IPL 2024 Hardik Pandya : मुंबई इंडियन्समध्ये माजली दुफळी... टीम रोहित अन् हार्दिक पांड्याचा वेगळा गट?

केकेआर करणार संघात बदल?

केकेआरने आयपीएल 2024 मधील आपला पहिला सामना जिंकला आहे. त्यांनी सनराईजर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला होता. त्यांनी पहिला सामना होम ग्राऊंड इडन गार्डनवर खेळला होता. त्यांनी पहिल्याच सामन्यात 208 धावा केल्या होत्या. केकेआरचे फलंदाज दमदार फलंदाजी करत आहेत. गोलंदाजीत देखील केकेआरने बरी कामगिरी केली आहे. केकेआर आपल्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल करेल असं वाटत नाही.

KKR ची संभाव्य प्लेईंग 11 :

फिल सॉल्ट, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, सुयष शर्मा

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com