IPL 2024 RCB vs LSG : घरच्या मैदानावर मयंक यादवने मोडले RCBचे कंबरडे! लखनऊने बेंगळुरूचा 28 धावांनी केला पराभव

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Score Updates News : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज पंधरावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला.
Mayank Yadav
Mayank Yadav RCB vs LSG IPL 2024 News Marathi sakal

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Scorecard Updates : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज पंधरावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. जे आरसीबीचे होम ग्राउंड आहे.

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या.

आरसीबीसमोर विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण आरसीबीचा संघ 19.4 षटकात 153 धावांवर ऑलआऊट झाला. आणि लखनऊने हा सामना 28 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 5 गडी गमावून 181 धावा केल्या होत्या आणि आरसीबीसमोर विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यामुळे आरसीबीचा संघ 19.4 षटकात 153 धावांवर ऑलआऊट झाला.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : मयंक यादवने RCBचे मोडले कंबरडे! बेंगळुरूचा अर्धा संघ तंबूत... जिंकण्यासाठी इतक्या धावाची गरज

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 103 धावांवर सहावा धक्का बसला. मयंकने रजत पाटीदारला देवदत्त पडिक्कलकरवी झेलबाद केले. रजतने 29 धावा केल्या. सध्या दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर क्रीजवर आहेत. 15 षटकांनंतर बेंगळुरूची धावसंख्या 6 विकेटवर 104 धावा आहे. त्यांना 30 चेंडूत 78 धावांची गरज आहे. मयंकने चार षटकांत 14 धावा देत तीन विकेट घेतल्या.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : मयंक यादवने RCBचे मोडले कंबरडे! बेंगळुरूला बसले 4 मोठे धक्के... कोहली-डुप्लेसिस मॅक्सवेलनंतर ग्रीनला बोल्ड

बेंगळुरूला 58 धावांवर चौथा धक्का बसला आहे. मयंक यादवने कॅमेरून ग्रीनला क्लीन बोल्ड केले. मयंक सलग दुसऱ्या सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीने कहर करत आहे.

याआधी त्याने मॅक्सवेललाही आऊट केले होते. आठ षटकांनंतर बेंगळुरूची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा आहे. सध्या अनुज रावत आणि रजत पाटीदार क्रीजवर आहेत.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : बेंगळुरूला तीन मोठे धक्के! कोहली-डुप्लेसिसनंतर मॅक्सवेलही आऊट

विराट कोहली आऊट झाल्यानंतर बंगळुरूला आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदाज मयंक यादवने पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात म्हणजेच सहाव्या षटकात फॅफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : शेवटच्या 2 षटकात पूरनचा तांडव! डी कॉकचे शतक हुकले... RCB ला दिले 182 धावांचे लक्ष्य

लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या. निकोलस पुरनने 21 चेंडूंत एक चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. लखनऊने शेवटच्या पाच षटकांत दोन गडी गमावून 50 धावा केल्या. यामध्ये शेवटच्या 2 षटकात पूरनचा तांडव पाहिला मिळाला, त्याने 19व्या षटकात 20 आणि 20व्या षटकात 13 धावा काढल्या.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : डी कॉकचे शतक हुकले... तुफानी सुरुवात लखनऊचा अर्धा संघ तंबूत

लखनौला 148 धावांवर पाचवा धक्का बसला आहे. आधी क्विंटन डी कॉक 56 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 81 धावा करून बाद झाला. त्याला रीस टोपलीने आऊट केले. त्यानंतर यश दयालने आयुष बडोनीची शिकार केले. बडोनी यांना खातेही उघडता आले नाही.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : मॅक्सवेलने केली लखनऊची दुसरी शिकार! 129 धावांवर राहुलच्या संघाला तिसरा धक्का

लखनऊला 129 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. मार्कस स्टॉइनिस १५ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याला मॅक्सवेलने केले. स्टॉइनिसने आपल्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार मारले.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : लखनऊची पडली दुसरी विकेट...., सिराजने पाठवले पडिक्कलला पॅव्हेलियनमध्ये

लखनऊ संघाला दुसरा धक्का नवव्या षटकात 73 धावांवर बसला आहे. सिराजने देवदत्त पडिक्कलला आऊट केले. त्याला 11 चेंडूत सहा धावा करता आल्या. सध्या डी कॉकने 43 धावा केल्या असून स्टॉइनिस क्रीजवर आहे. याआधी मॅक्सवेलने केएल राहुलला (20) बाद केले होते.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : तुफानी सुरुवातनंतर लखनऊला मोठा... कर्णधार राहुल 20 धावा करून आऊट

लखनऊ सुपर जायंट्सला 53 च्या स्कोअरवर पहिला धक्का बसला आहे. कर्णधार केएल राहुल 14 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. त्याला मॅक्सवेलने आऊट केले. सध्या देवदत्त पडिक्कल आणि क्विंटन डी कॉक क्रीजवर आहेत. सहा षटकांनंतर लखनऊची धावसंख्या एका विकेटवर 54 धावा आहे.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : लखनऊची तुफानी सुरुवात... बंगळुरुमध्ये राहुल अन् क्विंटन डी कॉक वादळ

लखनऊची फलंदाजी सुरू झाली आहे. रीस टोपलीच्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकने तीन चौकारांच्या मदतीने 12 धावा केल्या. राहुल डी कॉकसोबत क्रीजवर उपस्थित आहे. दोन षटकांनंतर लखनऊची धावसंख्या एकही विकेट न गमावता 19 धावा आहे.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : दोन्ही संघात मोठे बदल, जाणून घ्या Playing-11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिककल, आयुष बडोनी, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, नवीन उल हक, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मयंक यादव.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : लखनऊविरुद्ध बालेकिल्लात RCB ने जिंकली नाणेफेक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या जागी वेगवान गोलंदाज रीस टोपलीचा समावेश करण्यात आला आहे.

तर लखनऊचा कर्णधार केएल राहुलनेही प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. मोहसीन खानच्या जागी यश ठाकूरचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

IPL 2024 RCB vs LSG Live Score : विराट अन् नवीन उल हक पुन्हा आमनेसामने, पुन्हा होणार का वाद? थोड्याच वेळात रंगणार सामना

या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीचा महान फलंदाज विराट कोहली आणि लखनऊचा स्टार गोलंदाज नवीन उल हक आमनेसामने येणार आहेत. आयपीएल 2023 मध्ये जेव्हा या दोन संघांची शेवटची टक्कर झाली तेव्हा विराट आणि नवीन उल हक यांच्यात खूप वाद झाला होता. हा वाद इतका वाढला होता की, त्यावेळी लखनऊचा मेंटर गौतम गंभीरही विराट कोहलीसोबत भिडला होता. मात्र, यावेळी गौतम गंभीर एलएसजीसोबत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com