
IPL Final 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Live Updaete: पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाबने धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे आणि खेळपट्टी दुसऱ्या डावात फलंदाजीला मदत करते. त्यामुळे RCB ला आजचा सामना जिंकायचा असेल तर २४०+ धावा फलकावर चढवाव्या लागतील. रजत पाटीदारनेही RCB ला प्रथम गोलंदाजी करायची होती, हे मान्य केले.