
IPL Final 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Live Updaete: इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ पर्वात ७ संघांनी आतापर्यंत जेतेपदाची ट्रॉफी उचलली आहे. पण, यामध्ये ना पंजाब किंग्सचं नाव आहे, ना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं... RCB ने तीनवेळा फायनल गाठली, तर पंजाबने एकदा जेतेपदाची लढत खेळली, परंतु त्यांना यश मिळवता आले नाही. मात्र, आज हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदासाठी जोर लावणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही फायनल होत आहे आणि पावसाचा व्यत्यय आहेच. आयपीएलच्या निरोप समारंभातून भारतीय सैन्याला मानवंदना दिली गेली.