
IPL Final 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Live Update: पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचं आज कौतुक करावं तेवढं कमीच आहे. विराट कोहलीसारखा आक्रमक फलंदाज मैदानावर उभा असतानाही त्यांनी RCB च्या धावा जखडून ठेवल्या. विराट पहिल्या षटकापासून ते १५ व्या षटकापर्यंत मैदानावर उभा राहिला, पंरतु त्याला केवळ ४३ धावा करू दिल्या. PBKS च्या गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि त्यांनी संथ चेंडू व बाऊन्सर अशी रणनीती आखली होती.