IPL Final 2025 Royal Challengers Bengaluru Beat Punjab Kinsg: पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ मध्ये ज्या पद्धतीने खेळ केला होता, ते पाहता या संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले गेले होते. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये ६ धावांनी बाजी मारली आणि पंजाब किंग्सचे आयपीएल जेतेपद जिंकण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा अधुरे राहिले. मात्र, या अविश्वसनीय प्रवासानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) पुढील वर्षी जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी नक्कीच जोर लावू अशा विश्वास व्यक्त केला.