

Sanju Samson’s IPL 2025 future in doubt as scans awaited
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना थरारक झाला. दिल्लीच्या ५ बाद १८८ धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थानलाही ४ बाद १८८ धावा करता आल्या. मिचेल स्टार्कने सुपर ओव्हरमध्ये यॉर्करचा मारा करून त्यांना १० धावांवर रोखले आणि त्यानंतर लोकेश राहुल व त्रिस्तान स्तब्स यांनी चार चेंडूंत सामना जिंकला. या सामन्यातील संजू सॅमसन व राहुल द्रविड यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चांना फोडणी देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये द्रविड संघातील खेळाडूंसोबत बोलत असताना संजूने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले.