KKR vs SRH : झुंजार केकेआर 200 पार! पुन्हा शेवटचं षटक अन् समोर रिंकू सिंह मात्र सरशी उमरान मलिकची

Rinku Singh Nitish Rana KKR vs SRH
Rinku Singh Nitish Rana KKR vs SRHesakal

Rinku Singh Nitish Rana KKR vs SRH : सनराईजर्स हैदराबादचे 229 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला केकेआर जवळपास सामना गमवला होता. त्यात मार्को जेनसेनने केकेआरची अवस्था 3 बाद 20 अशी केली. मात्र तरी देखील झुंजार केकेआरने सामन्यात शेवटपर्यंत फाईट दिली. कर्णधार नितीश राणाने 75 तर रिंकू सिंहने नाबाद 58 धावा करत केकेआरला 205 धावांपर्यंत मजल मारली.

Rinku Singh Nitish Rana KKR vs SRH
Harry Brook : हॅरी ब्रुकचा हंगामतील पहिला शतकी दणका, हैदराबादने केकेआरच्या घरात घुसून ठोकल्या 228 धावा

सनराईजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाटी 229 धावांचा आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मार्को जेनसेनने केकेआरची अवस्था 3 बाद 20 धावा अशी बिकट केली होती. मात्र झुंजार कर्णधार नितीश राणाने आधी जगदीशन आणि नंतर रिंकू सिंह सोबत भागीदारी रचत केकेआरचा डाव सावरला.

नितीश राणाने जगदीशन सोबत 62 धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र ही जोडी मार्कंडेयने फोडली. त्याने जगदीशनला 36 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या आंद्रे रसेलला 3 धावांच्या पुढे मजल मारता आली नाही. रसेल बाद झाल्यानंतर आलेल्या रिंकू सिंहने गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील झुंजार वृत्ती दाखवली. त्याने नितीश राणा सोबत आक्रमक भागीदारी रचण्यास सुरूवात केली.

Rinku Singh Nitish Rana KKR vs SRH
WPL BCCI IPL : WPL वर्षाअखेरपर्यंत स्थगित करणार? आयपीएल सुरू असतानाच BCCI लागली मोठ्या तयारीला

दरम्यान, नितीश राणाने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 6.4 षटकात 69 धावांची भागीदारी रचत सामन्यात रंगत भरली. मात्र मोक्याच्या क्षणी नितीश राणा 41 चेंडूत 75 धावा करून बाद झाला. दरम्यान, रिंकू सिंहने सामन्याची सूत्रे हातात घेत अर्धशतकी खेळी केली. त्याने सामना पुन्हा एकदा शेवटच्या षटकापर्यंत नेला.

यावेळी सामना जिंकण्यासाठी 29 नाही तर 32 धावांचे आव्हान होते. समोर होती हैदराबादची तोफ उमरान मलिक. उमरान मलिकने आपल्या षटकात फक्त रिंकू सिंहला एकच षटकार मारण्याची संधी दिली. अखेर हैदराबादने सामना 23 धावांनी जिंकला. रिंकूने 31 चेंडूत नाबाद 58 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, लय सापडलेल्या सनराईजर्स हैदराबादने केकेआविरूद्ध त्यांच्याच होम ग्राऊंडवर 20 षटकात 4 बाद 228 धावा ठोकल्या. यात सलामीवीर हॅरी ब्रुकच्या 55 चेंडूत ठोकलेल्या 100 धावांचा मोठा वाटा होता. ब्रुकने एडिन मारक्रम आणि अभिषेक शर्मासोबत 72, 72 धावांची भागीदारी रचली. मारक्रमने 50 तर अभिषेक शर्माने 17 चेंडूत 32 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने 3 तर वरूण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com