Rishabh Pant: पंतचं 454 दिवसांनी पुनरागमन अन् प्रेक्षकांकडून उभं राहत टाळ्यांच्या गजरात स्वागत, Video तुफान व्हायरल

Rishabh Pant Comeback, PBKS vs DC: आयपीएल 2024 मधून ऋषभ पंतने तब्बल 454 दिवसांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. तो फलंदाजीला आला, तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहुन टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं.
Rishabh Pant Comeback
Rishabh Pant ComebackX/IPL

Rishabh Pant Comeback: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जात आहे. हा सामना पंजाबमधील मुल्लनपूर येथील महाराजा यादविंद्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

या सामन्यातून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्लीकडून 74 धावांवर 2 विकेट्स गमावल्यानंतर पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला.

Rishabh Pant Comeback
Dinesh Karthik RCB : हे खूप आव्हानात्मक आहे... पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या कार्तिकने दिले मोठे संकेत

डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर जेव्हा पंत फलंदाजी आला, तेव्हा स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांकडूनही त्याचे उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले.

पंतने अपघातातून सावरल्यानंतर या सामन्यातून क्रिकेटमध्ये तब्बल 454 दिवसांनी पुनरागमन केले आहे. यापूर्वी तो अखेरचा सामना 22 ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान बांगलादेशविरुद्ध कसोटीत खेळला होता.

पुनरागमनाबद्दल पंत म्हणाला, 'माझ्यासाठी हा भावूक क्षण आहे. पण मला सध्ये केवळ या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. मी पुढचा फार विचार करत नाहीये.'

पंतने पुनरागमानंतर फलंदाजी करताना 13 चेंडूत 2 चौकारांसह 18 धावांची खेळी केली. तसेच त्याने नंतर यष्टीरक्षणही केले.

Rishabh Pant Comeback
IPL 2024 PBKS Vs DC : अपघातानंतर मैदानात परतल्यानंतर ऋषभ पंत झाला भावूक! भविष्यातील रणनीतीवर म्हणाला...

पंतचा डिसेंबर 2022 च्या अखेरीस गंभीर कार अपघात झाला होता. त्यामुळे त्याला अनेक जखमा झाल्या होत्या. त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे या दुखापतींमधून सावरून पुन्हा तंदुरुस्ती मिळवण्यासाठी त्याला जवळपास 15 महिन्यांचा कालावधी लागला आहे.

त्यानेही जिद्दीने पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आहे. त्याचमुळे त्याचे सध्या कौतुक होते आहे. या आयपीएल हंगामापूर्वी त्याच्या तंदुरुस्तीची तपासणी झाल्यानंतरच बीसीसीआयने त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळण्याची परवानगी दिली होती.

त्यामुळे तो पुन्हा त्याच्या दिल्ली कॅपिटल्स संघात परतला. दिल्लीनेही त्याच्यावरचा विश्वास कायम ठेवताना त्याच्याकडे पुन्हा नेतृत्वाची धुराही सोपवली आहे. आता तब्बल 454 दिवसांनी पंतने मैदानात पाऊल ठेवले आहे. जर पंत या आयपीएलमध्ये त्याची छाप पाडू शकला, तर त्याचा विचार आगामी टी20 वर्ल्डकपसाठीही केला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com