Rishabh Pant Health Update
Rishabh Pant Health Updateesakal

Rishabh Pant Health Update : पंतवर प्रश्नचिन्ह! बीसीसीआयने सुरू केला दुसऱ्या विकेटकिपरचा शोध?

Rishabh Pant Health Update : भारतात सध्या आयपीएलचा फिव्हर सुरू आहे. मात्र बीसीसीआय आणि टीम इंडियाचा थिंक टँक सहा महिन्यानंतर होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकपसाठी तयारी करत आहे. मात्र बीसीसीआय आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अव्वल दर्जाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याला गुडघ्याला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून सात ते आठ महिने लागण्याची शक्याता आहे.

जर कोणता चमत्कार झाला तरच ऋषभ पंत ऑक्टोबरमध्ये महिन्यापर्यंत मैदानावर उतरू शकतो. त्यामुळे टीम इंडिया आता वनडे वर्ल्डकपसाठी केएल राहुल आणि इशान किशन या दोन विकेटकिपर पर्यायांचा विचार करत आहे.

Rishabh Pant Health Update
Ishant Sharma IPL 2023 : तब्बल 717 दिवसांनी IPL सामना खेळला अन् दिल्लीने मिळवला हंगामातील पहिला विजय

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'ऋषभ पंत गुडघ्यातून दुखापतीतून चांगल्या पद्धतीने बाहेर पडत आहे. मात्र त्याला अजून 7 ते 8 महिने चालण्यासाठी आणि स्ट्रेचिंग करण्यासाठी लागतील. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये खेळणे त्याच्यासाठी सध्या तरी फार दूर आहे. आम्ही फक्त तो पूर्णपणे फिट होऊन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरावा. या गोष्टीसाठी खूप वेग लागणार आहे. राहुल आणि इशांन यांच्यावर सध्या आमचे लक्ष आहे.'

दरम्यान, ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यातील सामन्यावेळी सांगितले की, 'मी चांगल्या प्रकारे दुखापतीतून सावरत आहे. मी प्रत्येक दिवशी रिहॅबमध्ये चांगली कामगिरी करत आहे. मी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत देखील जाणार आहे.'

Rishabh Pant Health Update
Twitter Blue Ticks : पैसे भरण्यास नकार? सचिन, विराटसह अनेकांनी गमावला ट्विटरवरील 'अधिकृत'पणा

ऋषभ पंतच्या गुडघ्यातील तीन लिगामेंट तुटले होते. अशा परिस्थितीत तो पुन्हा विकेटकिपिंग करू शकतो की नाही हे आताच सांगणे फार कठिण आहे. विकेटकिपिंग करताना गुडघ्यावर खूप ताण येतो. या गोष्टी बीसीसीआयच्या डोक्यात आहेत. त्यामुळे त्यांनी 2024 च्या टी 20 वर्ल्डकपसाठी देखील दुसरे पर्याय तयार करत आहे. यामुळेच इशान किशन सोबतच संजू सॅमसनला देखील बीसीसीआयने केंद्रीय करारात स्थान दिले आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com