Rishabh Pant and Jitesh Sharma hug after runout appeal withdrawal in IPL 2025 showing sportsmanship : आयपीएल 2025 चा शेवटचा साखळी सामना मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यात पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याने खेळाडूवृत्तीचे प्रदर्शन केले. पंतने जितेश शर्मा याच्याविरुद्ध रनआउट अपील मागे घेत क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. विशेष म्हणजे, अपील मागे घेताच जितेशने पंतकडे जाऊन त्याची गळाभेट घेतली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.