Rishabh Pant GT vs DC : पंत इज बॅक! स्वागत नही करोगे हमारा... धोनीसारखी चपळाई दाखवत निवडसमितीला केलं खूश, पाहा Video

Rishabh Pant GT vs DC Wicket Keeping Video
Rishabh Pant GT vs DC Wicket Keeping Video esakal

Rishabh Pant GT vs DC Wicket Keeping Video : ऋषभ पंत दुखापतीतून पूर्णपणे सावरला असल्याचे पुरावे दिल्ली विरूद्ध गुजरात सामन्यात मिळाले. ऋषभ पंत खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या मैदानावर अर्थाने परतला आहे. 15 महिन्यांनंतर पुनरागमन केल्यानंतर सर्वांनाच त्याच्या फिटनेसची चिंता लागली होती.

गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर यष्टीरक्षण किती आव्हानात्मक असू शकते हे पाहता, पंत यष्टीमागे सर्वोत्तम कामगिरी करेल का, असा प्रश्न लोकांना पडला. पुनरागमनाच्या तीन आठवड्यांनंतर पंतने खऱ्या अर्थाने फिटनेस टेस्ट पास केली.

Rishabh Pant GT vs DC Wicket Keeping Video
GT vs DC : पॉवर प्लेमध्येच गुजरात हरली! दिल्लीच्या वेगवान माऱ्यासमोर घरच्या मैदानावरच टाकल्या नांग्या

दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने एमएस धोनी सारखे लाईटनिंग फास्ट स्टंपिंग करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टायटन्स आधीच संघर्ष करत असताना, पंतने स्टंपच्या मागे जादू निर्माण केली आणि अभिनव मनोहरला क्षणार्धात तंबूत परत पाठवले.

अशाच प्रकारे त्याने डेव्हिड मिलरचा देखील एक अफलातून झेल टिपला. हा झेल पाहून पंत पूर्वीपेक्षाही चांगला फिट झाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आयपीएल इतिहासात सर्वाधिक स्टम्पिंग

गुजरात विरुद्ध दिल्ली सामन्यात दोन फलंदाजांना स्टंप आऊट केल्यानंतर पंतही दिग्गजांच्या यादीत सामील झाला. एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक सारख्या दिग्गजांचा समावेश असलेल्या, सर्वाधिक स्टंपिंग करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत तो आता पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. पंत अजून तरूण असल्याने त्याला या यादीत अव्वल स्थान गाठण्याची अधिक संधी आहे.

Rishabh Pant GT vs DC Wicket Keeping Video
GT vs DC IPL 2024 : दिल्लीनं गुजरातचा विषय 9 षटकातच संपवला; होम ग्राऊंडवर गिलला पंतनं दिलं मात

आयपीएलमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करणारे यष्टीरक्षक

महेंद्रसिंह धोनी - 42 स्टम्पिंग

दिनेश कार्तिक - 36 स्टम्पिंग

रॉबिन उथप्पा - 32 स्टम्पिंग

वृद्धीमान साहा - 26 स्टम्पिंग

ऋषभ पंत - 21 स्टम्पिंग

(IPL 2024 Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com