IPL 2022: ऋषी धवनची 'फेस शील्ड' गोलंदाजी; नेटकरी अवाक

ऋषी धवन चेहऱ्यावर मास्क लावून गोलंदाजी करताना पाहुन चाहते झाले अवाक
Rishi Dhawan Wears Unique Face Mask Bowling
Rishi Dhawan Wears Unique Face Mask Bowlingsakal

IPL 2022: आयपीएलचा 38 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळला गेला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. ऋषी धवनला सामन्यात पंजाब किंग्जकडून (PBKS) खेळण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे धवन सहा वर्षांनंतर आयपीएलमध्ये सामना खेळण्यासाठी आला होता. कालच्या सामन्यात ऋषी धवन चेहऱ्यावर मास्क लावून गोलंदाजी करताना आपल्याला दिसला. ज्यामुळे चाहत्यांना आवाक झाले. मास्कमुळे धवनचे नाक आणि वरचा भाग झाकला गेला होता. धवन नुकताच नाकाच्या दुखापतीतून परतला आहे, त्यामुळे गोलंदाजी करताना त्याने स्वत:चे संरक्षण करण्यासाठी हा मास्क घातला होता. गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत धवनने शिवम दुबेला आपला शिकार बनवला.(Rishi Dhawan Wears Unique Face Mask Bowling)

आयपीएल 2022 च्या लिलावात ऋषी धवनला पंजाब किंग्जने 55 लाख रुपयांना आपल्या टीम मध्ये घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादने (SRH) देखील लिलावात धवनची मूळ किंमत खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. धवनने गेल्या मोसमात विजय हजारे ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशकडून उत्कृष्ट कामगिरी केले होती. ऋषी धवनने विजय हजारे ट्रॉफीच्या 2021-22 हंगामात 458 धावांसह दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याच हंगामात आठ सामन्यांत सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता.

पंजाब किंग्जने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 187 धावा केल्या. शिखर धवनने ५९ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ८८ धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात CSK संघाला 6 बाद 176 धावा करता आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com