
रोहित शर्माच्या वाढदिवशी बायकोच्या विशेष शुभेच्छा, म्हणाली...
आयपीएलचा (IPL 2022) 15 वा हंगाम धमाकेदार सुरू आहे. आणि आज 30 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी त्यांची पत्नी रितिकाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले, जे आता प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये रोहित कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. 29 एप्रिलच्या मध्यरात्री, रोहित शर्माची पत्नी रितिकाने त्याला शुभेच्छा दिल्या आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले आहे की 'हॅपी बर्थडे रो, सॅमी आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आमचा हाकुना माता असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद' यासोबतच रितिकाने रोहितसोबतचे तिचे पाच फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये रोहित रितिका आणि सॅमीसोबत फिल्म नाईट एन्जॉय करताना दिसत आहे.(Ritika Sajdeh Instagram Post Rohit Sharma 35th Birthday)
रोहित शर्माची पत्नी रितिका व्यतिरिक्त, त्याच्या आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने देखील त्याचे सोशल मीडियाद्वारे वाढदिवस शुभेच्छा दिल्या आहे. रोहित आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २४ तासांत दीड लाख लोकांनी त्या पोस्टला लाईक केले आहे. युवराज सिंग, चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पाबरी हिनेही त्याला शुभेच्छा दिल्या. रोहितला त्याचे लाखो चाहतेही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
रोहित शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर झाला. त्याने भारतीय क्रिकेट संघात न्यूझीलंड विरुद्ध 2006 मध्ये पदार्पण केले आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 45 कसोटी सामन्यांमध्ये 3137 धावा, 230 एकदिवसीय सामन्यांमध्ये 9283 आणि 125 T20 सामन्यांमध्ये 3313 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी त्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधारही बनवण्यात आले होते. त्याच वेळी, त्याने त्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र यावेळी त्याचा संघ वाईट टप्प्यातून जात असून 8 पैकी एकही सामना जिंकलेला नाही. अशा स्थितीत त्याचे यावेळी आयपीएल जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे.
Web Title: Ritika Sajdeh Instagram Post Rohit Sharma 35th Birthday Sammy And I Love You So Much
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..