
मुंबईच्या 'या' खेळाडूवर चाहते संतापले; फसवणुकीचा केला आरोप
IPL 2022 : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्स टीम बरोबर या हंगामात काय चागलं घडत नाही. पाचवेळा विजेत्या संघाने यंदाचा आयपीएलमध्ये एकही सामना आतापर्यंत जिंकता आला नाही. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने सीएसकेविरुद्धचा सलग 7वा सामना गमावला. या पराभवानंतर जिथे चाहत्यांचा राग मुंबईच्या कर्णधार रोहित शर्मावर आला, तिथे आणखी एक खेळाडू असा आहे, ज्यावर लोक संतापले आहे. (Rohit Sharma Ishan Kisha Trolled After MI Lost To CSK)
हेही वाचा: Video : जर्सी क्रमांक 7 अन् मुंबईची सर्वात खराब कामगिरी; रोहितने पकडलं डोकं
मुंबईच्या पराभवात हा खेळाडू ठरला खलनायक
रोहित शर्माशिवाय त्याचा सहकारी सलामीवीर इशान किशन हा मुंबईच्या पराभवात मोठा खलनायक ठरला आहे. या सामन्यात ईशानला खातेही उघडता आले नाही. मुकेश चौधरीच्या एका खतरनाक यॉर्करने त्याची विकेट घेतला. ईशानसाठी हे आयपीएल दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. या हंगामात जेव्हा संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असायची तेव्हा तो आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतायचा. आयपीएल 2022 च्या 7 सामन्यांमध्ये त्याने केवळ 191 धावा केल्या आहेत.
हेही वाचा: IPL 2022: वानखेडे स्टेडियमवर दिल्ली-राजस्थानमध्ये आज सामना
इशान किशनच्या खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या संतापाचा भडका उडताना दिसत आहे. इशानला यंदा मुंबईने १५.२५ कोटी रुपयांमध्ये आपल्या पारड्यात समाविष्ट करून घेतले. यंदाच्या मेगा लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे नजरा त्याच्यावर होते. मात्र ईशानने यंदा पूर्णपणे निराश केले आहे. ईशानच्या खराब परफॉर्मन्सवर लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले आहे.
मुंबईचा संघ प्ले ऑफमधून बाहेर
मुंबई इंडियन्सलाया हंगामात सलग सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले असून संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. टिळक वर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 155 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होते. प्रत्युत्तर CSK ने 7 गडी बाद 156 धावा केल्या आणि IPL 2022 मध्ये त्यांचा दुसरा विजय नोंदवला आहे.
Web Title: Rohit Sharma And Ishan Kishan Got Brutally Trolled After Mi Lost To Csk Ipl 2022 Mi Vs Csk
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..