रोहित आउट होता की नव्हता? स्निकोमीटरमुळे सर्वांचे डोके भंजाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma baffling dismissal via DRS

रोहित आउट होता की नव्हता? स्निकोमीटरमुळे सर्वांचे डोके भंजाळले

Rohit Sharma IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रोहितने अवघ्या दोन धावा करत बाद झाला. टीम साऊदीने रोहितला यष्टिरक्षक शेल्डन जैक्सनच्या हाती झेलबाद केले, मात्र रोहितचा विकेट वादग्रस्त ठरला आहे. साऊदीकडून बॅक ऑफ लेन्थ बॉलचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना तो झेलबाद झाला. चेंडू त्याच्या मागच्या पायाला लागल्याची रोहितची खात्री होते, असे असतानाही यष्टिरक्षकासह उर्वरित खेळाडूंनी अपील केले. पंचांनी त्याला नॉट आऊट दिले. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने डीआरएसचा वापर केला.(Rohit Sharma baffling dismissal via DRS)

हेही वाचा: ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपपूर्वी T20 मालिकेसाठी भारतात येणार... पाहा वेळापत्रक

रिप्लेमध्ये चेंडू बॅटमधून जाण्यापूर्वी आणि नंतर अल्ट्रा-एजला मोठे स्पाइक्स दिसून येत होती. पण बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाकडे गेल्याचा तिसर्‍या पंचांचा विश्वास होता. अशा स्थितीत मैदानावरील पंचांचा निर्णय माघार घेतला. यानंतर रोहित निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये गेला. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 165 धावा केल्या. नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर या दोघांनी 43 धावांची खेळी खेळली. याशिवाय रिंकू सिंगने नाबाद 23 तर अजिंक्य रहाणेने 25 धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने पाच आणि कुमार कार्तिकेयने दोन खेळाडूंना बाद केले. मुंबई इंडियन्सला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि अवघ्या 113 धावांवर सर्वबाद .

हेही वाचा: गांगुलीची पत्नी होणार भाजप खासदार? अमित शाह यांच्या डिनरनंतर चर्चांना जोर

आयपीएल या हंगामातमध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून काही विशेष करू शकला नाही. रोहितने आतापर्यंत 11 सामन्यांत 18.18 च्या सरासरीने 198 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितचा स्ट्राइक रेट 125 आणि सर्वोत्तम धावसंख्या 43 धावा आहे.

Web Title: Rohit Sharma Baffling Dismissal Via Drs Ipl 2022 Mi Vs Kkr

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rohit SharmaIPLMIIPL 2022
go to top