IPL 2023: फोटो काढण्याच्या नादात रस्त्यात पडली मुलगी अन्... Mumbai Indians चा खेळाडू झाला ट्रोल

रोहितच्या पार्टीतील व्हिडिओ व्हायरल
Dhawal Kulkarni Trolled
Dhawal Kulkarni TrolledSAKAL

Rohit Sharma Birthday Party : आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी अंडवास येथे वाढदिवसाची पार्टी दिली. रोहितचा वाढदिवस 30 एप्रिलला आहे, पण त्या दिवशी मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सशी सामना आहे, त्यामुळे रोहितने त्याच्या वाढदिवसाची पार्टी मुंबईतील वरळी येथे अगोदर आयोजित केली होती.

रोहितच्या पार्टीला मुंबई इंडियन्सचे सर्व क्रिकेटर्स पोहोचले. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा धवल कुलकर्णीही त्याच्या पार्टीला पोहोचला मात्र त्याच्या एन्ट्रीमुळे तो एका नव्या वादात सापडला आहे.

Dhawal Kulkarni Trolled
IPL 2023 : गौतम गंभीरने असं काही केलं की जगाला बसला धक्का! व्हिडिओ झाला व्हायरल

वास्तविक जेव्हा धवल कुलकर्णी रोहितच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला तेव्हा एक घटना घडली, ज्यामुळे तो वादात सापडला आहे. धवलच्या एन्ट्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. धवल कुलकर्णी पार्टीत पोहोचल्यावर अचानक एक मुलगी गेटवर रस्त्यावर पडल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. आजूबाजूचे लोक मुलीच्या मदतीसाठी पुढे सरसावतात, पण पुढे जाण्याऐवजी धवल कुलकर्णी त्याच्या फोटो सेशनमध्ये व्यस्त होतो.

Dhawal Kulkarni Trolled
WTC फायनलपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! हा दिग्गज खेळाडू IPL मध्ये सतत होतोय फ्लॉप अन्...

व्हिडिओमध्ये धवल कुलकर्णी कार्यक्रमस्थळी पोहोचला आहे. त्याच्या एंट्रीच्या वेळी एक मुलगी अचानक गेटवर पडली. धवल कुलकर्णीलाही मुलगी पडताना दिसली, पण तिला मदत करण्यासाठी पुढे जाण्याऐवजी तो तिथेच उभा राहिला आणि फोटो सेशनमध्ये व्यस्त झाला. त्याचवेळी मुलीला उचलण्यासाठी 2-3 जण तिथे येतात. धवलच्या या वृत्तीवर लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत आणि त्याला वाईट व्यक्ती म्हणत आहेत.

धवल कुलकर्णीच्या या व्हिडिओवर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, "त्याला महिलांचा आदर नाही." त्याचवेळी, दुसर्‍या युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे - "जर एखादी मुलगी किंवा मुलगा पडला तर त्यांना उचलले पाहिजे, परंतु तो फोटो काढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com