रोहित होणार भारताचा नवीन कर्णधार! विश्वचषकानंतर घोषणा | Rohit Sharma Captain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli And Rohit Sharma

रोहित होणार भारताचा नवीन कर्णधार! विश्वचषकानंतर घोषणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतीय संघाचे कर्णधारपद खूप काटेरी असते असे म्हटले जाते. कारण, प्रेक्षकांना संघाकडून मोठ्या अपेक्षा असतात. देशातील चाहते खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी डोक्यावर घेतात तर खराब कामगिरी केली तर शिव्याही घालतात. टी-२० मध्ये सुमार कामगिरी केल्याने विराट कोहली कर्णधार पद सोडणार आहे. त्यामुळे नवीन कर्णधार कोण? याबर मंथन केले जात आहे. आता नाव पक्क झाल असून, टी-२० वर्ल्डकपनंतर याची घोषणा केली जाणार असल्याचे समजते.

टी-२० विश्वकरंडकाला सुरुवात झाली आहे. हा विश्वकप पार पडल्यानंतर आपण कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे विराट कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे. विराट कोहलीने आपला राजीनामा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे अर्थात बीसीसीआयकडे सादर केला आहे. यामुळे नवीन कर्णधार कोण यावर मंथन केले जात आहे.

हेही वाचा: आईच्या मृत्यूला न आलेला मुलगा दशक्रियेला आला अन् गमावला जीव

मागे हिटमॅन रोहित शर्माला कर्णधार न करता यष्टीरक्षक रिषभ पंतला कर्णधार करण्याची मागणी विराटने केल्याची चर्चा होती. यावरून संघात आणि विराट व रोहितमध्ये पटत नसल्याची चर्चा सुरू झाली होती. असे असले तरी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने रोहित शर्माच टी-२० चा कर्णधार असणार या बातमीला दुजोरा दिला आहे.

मेगा इव्हेंटनंतर घोषणा

रोहित शर्माचा टी-२०चा कर्णधार होणार हे जवळजवळ पक्के झाले असले तरी याची घोषणा विश्वचषक पार पडल्यानंतरच केली जाणार आहे. रोहित सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. रोहित कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधार कोण होणार हे ठरलेले नाही. यासाठी केएल राहुल प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी रिषभ पंतही प्रबळ दावेदार आहे.

loading image
go to top