Rohit Sharma Hardik Pandya : ही तर सुपरस्टार टीम म्हणणाऱ्या हार्दिकला रोहितने दिले चोख प्रत्युत्तर

Rohit Sharma Hardik Pandya
Rohit Sharma Hardik Pandyaesakal

Rohit Sharma Hardik Pandya : मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातील एक सर्वात यशस्वी टीम आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने 5 वेळा आयपीएलवर आपले नाव कोरले आहे. दरम्यान, 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून पदार्पण केले होते. मात्र हार्दिक आता मुंबई संघाचा भाग नसून तो 2022 पासून गुजरात टायटन्सचे नेतृत्व करतोय.

हार्दिकने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाला होता की मुंबई इंडियन्स ही एक सुपरस्टार टीम आहे. ते सगळ्या चांगल्या खेळाडूंना खरेदी करतात. आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या जुन्या सहकाऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

Rohit Sharma Hardik Pandya
LSG vs MI Eliminator : 5 धावा 5 विकेट्स माधवालने लखनौच्या नवाबी थाटची लावली वाट

रोहित शर्माने कोणाचे नाव न घेता जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'खरं सांगू तर जशी बुमराह, हार्दिकची स्टोरी होती तशीच स्टोरी होईल. तिलक वर्मा आणि नेहल वढेरा या सारख्या लोकांची स्टोरी देखील त्यांच्यासारखीच होईल. पुढेच्या दोन वर्षातच हे होईल त्यावेळी लोकं अरे ही तर सुपरस्टार टीम आहे असे म्हणतील.' रोहित म्हणाला की आम्ही या (क्विंटन डिकॉक, ट्रेटं बोल्ट, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या) खेळाडूंना तयार केले. दुसरे संघ त्यांना ठेवून देखील घेत नव्हते. आम्ही त्यांच्यातील क्षमता ओळखली आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली.

Rohit Sharma Hardik Pandya
Akash Madhwal LSG vs MI : लखनौची पळता भुई थोडी! नवीनला आकाशचं प्रत्युत्तर; क्रुणाल झाला,मुंबईचा मोर्चा हार्दिककडे

10 लाखात विकला होता हार्दिक

मुंबई इंडियन्सने अनेक टी 20 चा अनुभव नसलेल्या खेळाडूंना घेऊन आले आहेत. नेहाल वढेराने आयपीएलच्या लिलावापर्यंत कोणताही टी 20 सामना खेळला नव्हता. आयपीएलच्या 2014 च्या लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर मुंबईने 2015 मध्ये हार्दिकला 10 लाखात खरेदी केले होते. तो 2021 पर्यंत मुंबई इंडियन्ससोबत होता. क्रुणाल 2016 मध्ये मुंबईशी जोडला गेला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com